प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
शाहुवाडी - गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे रहात असलेले मलीक दावलसाब मुलतानी (वय 24.) यांचा गुरुवारी ता.20/06/2024 रोजी सकाळच्या सुमारास ओकोली फाटा येथे शाहुवाडी रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
नागदेववाडी येथे एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथे रहात असलेले महादेव मारुती दिवसे (वय 65) यांनी गुरुवार दि.20/06/2024 रोजी साडेचारच्या सुमारास रहात्या घरात" क्लायरीस "नावाचे विषारी औषध सेवन केल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.