प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील टोप येथील राजेंद्र आनंदा लुगडे (वय 32.रा.टोप ता.हातकंणगले ) याने रविवार दि.16/06/2024 रोजी दुपारी चारच्या सुमारास रहात्या घरात लोंखडी पाईपला साडीने गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत उपचारसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
राजेंद्र हा विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत.राजेंद्र हा सेंट्रिंगची कामे करत होता.त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
Tags
कोल्हापूर