प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - बोरपाडळे फाट्याजवळ ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत मारुती रामचंद्र महाजन (वय 57) आणि सुगंधा मारुती महाजन (वय 50) हे दोघे पती पत्नी जागीच ठार झाले.
अधिक माहिती अशी की,कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे येथे असलेल्या बोरपाडळे फाट्या जवळ हॉटेल सुरज नाष्टा सेंटर असून आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास टू व्हिलर ACTIVA (MH -09 .EQ - 2807) महाजन पती पत्नी थांबले होते .या वेळी टाटा कंपनीचा ट्रक नं.MH -11-CH-6617 या ट्रक वरील चालकाचा ताबा सूटून रोड्च्या कडेला थांबलेल्या महाजन पती पत्नीस जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जागीच ठार झाले.तसेच तेथील इलेक्ट्रीक पोल सुध्दा मोडलेला आहे.आणि टाटा Tigor MH- 08 -AX -6053 या गाडीतील मागील बाजूचे नुकसान झाले असून सदर गाडीतील इसम तेथे असलेल्या हॉटेल सुरज मध्ये नाष्टा करीत बसल्यामुळे टाटा Tigor या गाडीतील कोणीही जखमी नाही.या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.