प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुरातील एका संकुलातील 16 वर्षाची अल्पवयीन अविवाहित मुलगी प्रेग्न्ंट असल्याची बातमी सर्व प्रथम वृत्त पुण्यातील प्रेस मीडिया लाईव्हने प्रसिध्द केल्याने खळबळ उडाली असून या बाबत शासकीय यंत्रणेला अजून जाग आलेली नाही.या कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. .
या बाबतची सविस्तर माहिती अशी की , कोल्हापूर परिसरात असलेल्या एका संकुलातील 16 वर्षाची मुलगी ही अल्पवयीन असून अविवाहित असल्याने तिच्या पोटात दुखत असल्या कारणाने तिला उपचारासाठी त्या संकुलातील काळजी वाहिका महिलेने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ती आठ महिन्याची प्रेग्न्ंट असल्याचे समजल्याने त्या अल्पवयीन मुलीस डिलीव्हरी साठी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.