धन्य ते मतदार व धन्य ते सन्मानाने निवडून आलेले खासदार

 मोठ्या लोकशाहीचा विजय असो!

प्रेस मीडिया लाईव्ह :

१८ व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित ५४३खासदारांची यादी प्रसिद्ध झाली. त्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅंटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार,५४३ नवनिर्वाचित खासदारापैकी २५१ खासदारांवर (४६ टके) गंभीर गुन्हे दाखल आहेत. या २५१ खासदारांपैकी १७० (३१ टक्के) जणांवर बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गंभीर गुन्हद्यांचे गुन्हे दाखल आहेत.

लोकसभेत निवडुन गेलेल्या २५१ खासदारांवर गंभीर गुन्हें दाखल असण्याचा हा संसदीय लोकशाहीतला आतापर्यतचा विक्रम आहे.यामधील २७ नवनिर्वाचित खासदारांनी त्यांच्यावरील दाखल गुन्हद्यांची माहिती त्यांच्या निवडणुकीच्या शपथपत्रात नोदविल्यानुसार , तेगंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरल्याचे जाहीर केले आहे. त्यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाशी संबंधित चार प्रकरणे आणि कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नांची २७ प्रकरणे आहेत. यावर आता विचार करण्याची वेळ आाली आहे. लोक्शाहीच्या पवित्र मंदिशात हे सर्व गुन्हेगारी पार्शभूमीचे, परंत् माननीय खासदार देशाचे भविष्य ठरवणार आहेत. खरेच, धन्य ते राजकीय ज्यांनी यांना उमेदवारी दिली. धन्य ते मतदार ज्यांनी यांना निवडुन दिले, धन्य ते सन्मानाने निवडून आलेले खासदार. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असो 

|

Post a Comment

Previous Post Next Post