स्मार्ट मीटर विरोधात वाढत चाललेला असंतोष पाहून राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला

 आता घरी पूर्वीचेच मीटर राहणार, 

प्रेस मीडिया लाईव्ह :

स्मार्ट मीटर विरोधात वाढत चाललेला असंतोष पाहून राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.आता पूर्वीचीच मीटर पद्धत कायम राहणार आहे . ऊर्जामंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिलीये. त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.

स्मार्ट मीटरचे कंत्राट कुणाकुणाला दिले होते 

अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती.

परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे

Post a Comment

Previous Post Next Post