प्रेस मीडिया लाईव्ह :
मोदी आणि शाह यांच्या आवाहनानंतर 31 मे रोजी मार्केट डबलने वाढलं. त्यानंतर 3 जून रोजी मार्केट वाढतं. 4 जून रोजी मार्केट पडतं. हे कोण लोक आहेत? घपला होणार हे त्यांना माहीत होतं. हजारो कोटी रुपये या ठिकाणी गुंतवले गेले. फॉरेन गुंतवणुकदारांनीही गुंतवणूक केली. त्यानंतर 30 लाख कोटी रुपये बुडाले. रिटेल गुंतवणूकदारांचं नुकसान झालं.
हा स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा स्कॅम आहे. निवडणुकीत किती जागा येतील हे माहीत असूनही मोदी आणि शाह यांनी शेअर खरेदी करायला लावले. त्यामुळे या सर्व प्रकरणाची जेपीसी चौकशी झाली पाहिजे. हा मोठा घोटाळा आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा आहे. मोदी, शाह, एक्झिट पोल करणारे आणि परदेशी गुंतवणूकदार यांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.