तरी हा नरेंद्र मोदी या 'ब्रँंड' चा ऐतिहासिक पराभव आहे.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे नवे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ असले तरी हा नरेंद्र मोदी या 'ब्रँंड' चा  ऐतिहासिक पराभव आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात भारतीय मतदार कायमच शहाणपणाने मतदान करीत आले आहेत. भारतीय मतदाराला गृहित धरलेले आवडत नाही आणि तो ्याची ताकद फारसे न बोलता अचूकपणे वापरत असतो. एकही मतदानोत्तर चाचणी निकालांच्या आसपासही जाऊ शकली नाही,

 याचेही कारण भारतीय मतदारांचे शहाणपण आणि ते जपून-झाकून ठेवण्याची हुशारी हेच आहे. ही निवडणूक म्हणजे केवळ एक औपचथारिकता आहे आणि आपला 'ईध्वरदत्त' विजय आधीच झाला आहे; अशा भ्रमात अनेकजण होते. त्यांचे पाय या निकालांनी जमिनीला लागले तर बरे होईल. अनपेक्षित आणि अतक्य असे काही घडले नाही तर येणारे सरकार भाजपचे किंवा मोदींचे नसेल. ! ते एनडीएचे असेल, मंगळ्वारी सायंकाळी पत्रकारांशी। बोलताना राहल गांधी यांनी 'इंडिया' ची बैठक होईल आणि तीत सरकार स्थापनेची शक्यता आहे का, हे आजमावून पाहिले जाईल, असे म्हटले. निकालांचे अंकगणित पाहता कॉँग्रेस व मित्रपक्ष सरकार स्थापनेचा दावा करतील, असे वाटत नाही. तसे करणे योग्य ठरणार नाही. लागोपाठ दोन निवडणुकांमधील घनघोर पराभवानंतर कॉग्रेसने मिळवलेले यश मोलाचे आहे. कॉँग्रेस कडे आता अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद येईल. रायबरेली आणि वायनाड जिंकलेल्या राहुल गांधी यांनी पद ध्यायला हवे आणि संसदेत विरोधकांचा आवाज मजबूत करायला हवा. आता कॉँग्रेसला नवा तडफदार अध्यक्षही मिबळायला हवा.गेल्या पाच-सात वर्षामध्ये भाजप वाढ़त्या वेगाने मोदी केंद्रित होत गेला. पक्षाची ही विपरीत आत्मगती मोदींनी रोखायला हवी होती. मात्र, झाले ते उलटेच. निर्णयांचे, प्रचाराचे, आकांक्षांचे हे केंद्रीकरण मोदींनी अधिकच वेगवान केले. मोदींची प्रचार सभां मधील सर्व भाषणे केवळ प्रथम पुरुषी एकवचनी' होऊ लागली. आपल्याइतके सतेचे व्याकरण कुणाला समजते, असा तोरा असणान्यांना भाषेच्या व्याकरणात 'प्रथमपुरुषी अनेकवचन ही असते, याचा विसर पडला. मतदारांना हेही आवडत नाही. अयोध्येतील राममंदिराच्या सगळ्या कामाचा झोत मोदींनी कायम स्वत:वर ठेवला. याही मतदारसंघात मतदारांनी भाजपला अस्मान दाखविले आहे. भाजप आणि विशेषकरून मोदी यांना पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाच्या ध्यानास बसण्यासाठी इतके दुसरे सबळ कारण नसेल. राहल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील मतदारांचे खास आभार मानले. 

कॉग्रेसने आपला अहंकार बाजूला ठेवून समाजवादी पक्षाशी आघाडी केल्यामुळे उत्तर प्रदेशात विरोधकांना हे यकश मिळाले आहे. 'इंडिया ने हे शहाणपण देशभरात दाखविले असते आणि ममता बॅनर्जी तसेच नितीश कुमार यांची साथ लाभली असती तर आज याहून वेगळे निकाल लागले असते. विरोधकांचे ऐक्य असेल आणि थोडेबहुत सामंजस्य दाखविले तर काय होऊ शकते,! हे कंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दाखवून दिले आहे.  विशेष म्हणजे  योग्य वेळी जागरूक झालेले मतदारांनी नरेंद्र मोदी या 'ब्रँंड' चा ऐतिहासिक पराभव केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post