रायगड मधून सुनिल तटकरे (राष्ट्रवादी, अजित पवार गट ) विजयी



प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

अजित पवारांच्या लोकसभेचे चार उमेदवार धोक्यात असताना रायगडमधून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड मध्ये सुनिल तटकरे यांनी विजय संपादन केला आहे.एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा सुनिल तटकरे यांनी तब्बल 82 हजारांच्या फरकाने पराभव केला आहे.

रायगडातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष होते. तटकरे विरुद्ध गीते ही लढत अटीतटीची होईल, असे वाटत होते. मात्र आज (4 जून) सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरु झाली, 28 फेर्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार होती. पहिल्या फेरीची आकडेवारी हाती आली तेव्हा तटकरे 592 मतांनी आघाडीवर होते. दुसर्‍या फेरीत 5 हजार 383, तिसर्‍या फेरीत 10 हजार 745....अशी मतांची आघाडी वाढतच गेली. त्यानंतर एक एक करुन सर्व फेर्‍यांची आकडेवारी समोर आली आणि सर्व फेर्‍यांमध्ये तटकरेंनी आपली आघाडी कायम ठेवली ती शेवटच्या फेरीपर्यंत.

अंतिम निकालाची आकडेवारी

1. सुनिल तटकरे (राष्ट्रवादी, अजित पवार गट ) : 5 लाख 8 हजार 352

2. अनंत गिते (शिवसेना,ठाकरे गट) : 4 लाख 25 हजार 568

3. कुमुदिनी चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) : 19 हजार 318

Post a Comment

Previous Post Next Post