प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील प्रतिष्ठित नागरीक शुक्रवार दिनांक २१ जून रोजी सकाळी १० वाजता राष्ट्र भूषण चौक ते एस पी कॉलेज या दरम्यान घोड्यावरून प्रवास करणार आहेत.पुणे शहरात प्रवास करणे पुणेकरांना अगदी जिकरीचे झाले आहे पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. या बाबत प्रशासन मात्र डोळे मिटून बसलेले आहेत .
आरटीओ, महानगरपालिका वाहतूक आणि पोलीस शाखा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, अजित अभ्यंकर डॉ. सतीश देसाई आदी सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले.