युती सरकारचे फसवे अंदाज पत्रक --- १० पैकी ० गुण.



प्रेस मीडिया लाईव्ह :

 महायुतीतील युती सरकारचे यंदाचे अंतरिम अंदा पत्रक म्हणजे घोषणांचा पाऊस आहे. राज्याच्या विकासाची कोणतीही दूरदृष्टीची योजना यात आखली गेली नसून सर्वसामान्य नागरिकांवर आश्वासनांची अक्षरश: अतिवृष्टी झाली आहे. वास्तविक राज्यावर मोठा कर्जाचा डोंगर असताना खिरापत वाटल्या प्रमाणे या घोषणांचा पाऊस पाडणे निश्चितच महाराष्ट्राला हानीकारक आहेच शिवाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने युती सरकारच्या सर्व घटक पक्षांना धुळ चारली त्याचा धसका घेऊन हे अंदाज पत्रक केले गेले आहे. 


मुख्य म्हणजे अवघ्या ३ महिन्यांत आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हे युती सरकार पूर्णपणे पराभूत होणार असून त्यामुळेच या योजनांची अंमलबजावणी होणारच नसल्यामुळे त्यांनी आश्वासनांची खैरात केली आहे. राज्यातील पीक वीमा योजना तसेच शेतकऱ्यांच्या बाबतही यांच्या सर्व योजना फसव्‍या ठरल्या असून राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, दलित, भटक्या विमुक्त, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक या फसव्‍या घोषणांना फसणार नाहीत. जर गुण द्यायचेच असले तर या फसव्‍या अंदाज पत्रकाला युतीच्या प्रगती पुस्तकात शून्य मार्क द्यावे लागतील. अर्थात मोडतोड आणि पक्ष फोडाफोडी करून २ वर्षांसाठी सत्तेवर आलेल्या या जनता विरोधी सरकार कडून अन्य अपेक्षा तरी काय करणार?

 

 

आपला

ॲड. अभय छाजेड

सरचिटणीस,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Post a Comment

Previous Post Next Post