इंद्रायणी जलप्रदूषणाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर शिवसेनेचे पालखी आंदोलन .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : इंद्रायणी नदीला हिंदुधर्मात मानाचे स्थान आहे, आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी महाराष्ट्र - कर्नाटक मधून आळंदीत येतात , ज्ञानेश्वर माऊलींच्या या आळंदीत इंद्रायणी प्रदूषणावर मागील अनेक दशके चर्चा चालू आहे, यावर मागील वर्षांमध्ये अनेक आंदोलने झाली तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आजही निद्रा अवस्थेत असल्याचे दिसून येते.
मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांनी यावर आवाज उठवून ही प्रशासन आणि सत्ताधारी ह्यावर काहीच काम करीत नसून फक्त आषाढी वारी आली की तात्पुरते मलमपट्टी करण्याचे काम चालू आहे, आणि सत्ताधारी मिंदे फडणवीस सरकार फक्त घोषणा करण्यात मग्न आहेत काम तर शून्य झाले आहे . या विरोधात शिवसेना पुणे शहर मागील वर्षापासून पत्रव्यवहार करीत असून परिस्थिती जैसेथे च आहे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषण विषयात तत्परतेने पाऊले उचलावीत यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने वारकरी तसेच माऊली भक्तांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ शिवाजी नगर पुणे कार्यालयावर इंद्रायणीचे प्रदूषित पाणी आणून त्याची प्रतिकात्मक पालखी करुन वारकरी बांधवांसोबत आंदोलन केले यावेळी वारकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्री ,उपमुखमंत्री आणि प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष यांविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली .
आणि प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देण्याआधी तीर्थ म्हणून इंद्रायणीचे प्रदूषित जल पाजले आणि सोबत शहरप्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे यांनी ही ते प्राशन केले .
यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे यांनी वारकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रशासनाला आणि शासनाला ठणकावून सांगितले यापुढे शिवसेना प्रशासनाला प्रदूषित पाण्याने आंघोळ घालायला ही मागेपुढे पाहणार नाही त्यामुळे तत्परतेने प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष द्यावे इंद्रायणी प्रदूषण विषयात पर्यावरण मंत्री, उद्योग मंत्री, नगरविकास मंत्री ही फेल झाले आहेत.
गजानन थरकुडे यांनी बोलताना सिव्हेज ट्रिटमेंट प्लांट यांची आजची परिस्थिती आणि कार्यक्षमता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले , तर पर्यावरण प्रेमी तसेच प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी नदी काठ सुशोभिकरणा पेक्षा नदी स्वछता , तसेच इंद्रायणी उगमापासून एसटीपी प्लांट ची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे नमुद केले .
यावेळी आंदोलनात आळंदीहून वारकरी स्वतः सहभागी झाले होते त्यांसोबत शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, समीर तुपे, आनंद गोयल, भरत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, सहसंपर्क सांघटिका कल्पनाताई थोरवे, स्वाती ढमाले, राजेंद्र बाबर, अतुल दिघे, राजेश मोरे, मुकुंद चव्हाण, जगदीश दिघे, प्रविण डोंगरे, मकरंद पेठकर, प्रसाद चावरे, किशोर रजपूत, संतोष गोपाळ, नागेश खडके, इम्रान खान, युवासेनेचे राम थरकुडे ,युवराज पारीख, गणेश काकडे, प्रसाद जठार, पुरुषोत्तम विटेकर, सिधांत भालेराव, सूर्यकांत पवार, मनोज यादव , राहुल शेडगे, बद्रुदिन शेख, हेमंत यादव , परेश चौरे, संजय गवळी, हेमंत धनवे, नितीन दलभंजन, फैजान पटेल, शाहबाज पंजाबी, महिला आघाडीच्या अमृत पठारे, रोहिणी कोल्हाळ, विदया होडे, जोती चांधेरे, सोनाली जुनवणे, अश्विनी मल्हारे, प्रविनी भोर, पूजा उलालकर, अलका भांडरे, शीतल पाठमासे इतर शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते .