मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

​पुणे : मतदारांच्या प्रभावी आणि संघटीत जनआंदोलनातून आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन ​करण्याच्या हेतूने भारत जोडो अभियान​च्या वतीने मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशा​ळेचे आयोजन करण्यात आले होते.​रविवार, १६ जुन २०२४ रोजी ​,दुपारी अडीच वाजता​  साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे​ येथे ही कार्यशाळा झाली.

ऋषिकेश येवलेकर यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींना मार्गदर्शन केले. या वेळी संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.ऋषिकेश येवलेकर म्हणाले "संविधानाने भारतीय नागरिकांना सर्वात महत्वाचा दिलेला अधिकार म्हणजे मतदान करणे हा आहे. मतदार यादीत नाव नसणे म्हणजे एक प्रकारचा मृत्यूच होय. त्यामुळे मतदार यादी मध्ये आपले नाव आहे की नाही, हे आपण आपल्या मोबाईलवर व्होटर हेल्पलाईन या याप द्वारे घरबसल्याही तपासून बघता येते "

"आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यावरील एपिक नंबर या याप मध्ये टाकून आपले नाव या यादीत आहे की नाही हे तपासून पाहता येते" अशीही माहिती येवलेकर यांनी दिली.निवडणूक ओळखपत्रावरील क्यू आर कोड द्वारे सुद्धा आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासता येते., असेही ऋषिकेश येवलेकर म्हणाले.

नवीन मतदार नोंदणीसाठी सहा नंबरचा अर्ज याच यापवर मोबाईल वरून भरता येईल, तसेच घरातील कोणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नाव वगळण्यासाठी सात नंबरचा अर्जही या याप मध्ये भरता येईल, अशीही माहिती येवलेकर यांनी दिली."नवीन मतदार नोंदणीसाठी मतदाराचे आधार कार्ड, जन्म दाखला, लाईट बील, वाहन परवाना, दहावी मार्क शीट, पासपोर्ट, भाडे करार बॅंक पासबुक आवश्यक पण वरील कोणतीही कागदपत्रे नसली तरी बीएलओला त्या व्यक्तीने तीन वेळा व्हेरीफाय केले तर अशा अगदी रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीचेही नाव मतदार यादीत येऊ शकते, अशीही माहिती येवलेकर यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीतून जाणूनबुजून वगळण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागृक होऊन स्वतःचे नाव यादीत यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही मत येवलेकर यांनी व्यक्त केले.

संदीप बर्वे​(सचिव, पुणे जिल्हा​,​भारत जोडो अभियान​ ) ,इब्राहीम खान​(समन्वयक, पुणे लोकसभा मतदारसंघ​,भारत जोडो अभियान​) , एकनाथ पाठक ​(सहसचिव, पुणे जिल्हा​ भारत जोडो अभियान​) आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post