नृत्य रूपक' कार्यक्रमात कथकचे बहारदार सादरीकरण !

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित  'नृत्य रूपक'  कार्यक्रमात कथक नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.'रूपक नृत्यालय,पुणे 'तर्फे प्रस्तुत या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.   

नुकत्याच रशियातील मॉस्को येथे पार पडलेल्या सातव्या ब्रिक्स  फेस्टिवल मध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाने यशस्वीरित्या भारताचे प्रतिनिधित्व केले होते,या दौऱ्याचे अनुभव देखील उलगडून दाखविण्यात आले.माजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. रूपक नृत्यालयाच्या संचालक  मंजिरी कारुळकर आणि  १० कलाकारांनी  ब्रिक्स महोत्सवात सादर केलेल्या कथक नृत्याचे सादरीकरण  आणि तेथील अनुभवकथन या कार्यक्रमात  आयोजित केले होते. त्यांच्याशी नीरजा आपटे यांनी संवाद साधला.मंजिरी कारुळकर यांच्यासह इशानी सेनजित, शांभवी शेटे, मधुरा कुंटे, अनुष्का जाधव, आर्या जोशी, साक्षी कपिल, भार्गवी गोसावी, उर्वी हडप, प्रशांत राऊळ, शाल्मली साळसकर, नीरजा आपटे सहभागी झाले.कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. ' गजझंपा  ताल 'सादर करण्यात आला. राग मल्हार वर आधारित वर्षा ऋुतू ची नृत्य प्रस्तुती सादर करण्यात आली. नृत्यगुरु  मंजिरी कारूळकर यांनी रशियन कविता प्रस्तुत केली. कार्यक्रमाची सांगता ' गंगावतरण ' या नृत्य प्रस्तुतीने झाली.

'भारताचे  प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही  आमची वेशभूषा  केली. ती तिथल्या लोकांना खूप आवडली.भारत , रशिया, बेलारूस, चीन अशा विविध देशांतील कलाकार होते. त्यांच्या बरोबर आदान प्रदान चांगले झाले. सगळ्यांचे अभिप्राय मिळाले. तिथल्या कलाकारांशी संवाद झाला. आमच्या बरोबर दुभाषी होते. कथक चा मास्टर क्लास स सगळ्यांना खूप आवडला.  साऊथ आफ्रिका आणि रशिया या देशातील कलाकारांच्या नाट्य प्रस्तुतीमधे नृत्य होते. ते  खूप आवडले. आमचे सादरीकरण आणि अभिनय यांच्यामुळे कुठेच भाषेचा अडसर आला नाही.आमच्या सगळ्यांच्या पालकांनी खूप आधार दिला आणि सहकार्य केले. रशिया मधे  निसर्ग, देश ,कला  या प्रती त्या देशातील लोकांची सजगता खूप आवडली',असे मनोगत या कलाकारांनी व्यक्त केले.ब्रिक्स येथे सादर झालेल्या मृत्य महोत्सवाची व्हिडिओ फीत यावेळी दाखविण्यात आली.

हा कार्यक्रम रविवार,दि.२३ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.रसिकांना तो विनामूल्य खुला होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१५ वा कार्यक्रम होता.





Post a Comment

Previous Post Next Post