प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : दि.०७,.०६.२०२४ रोजी मा. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी कळस,धानोरी भागातील नाल्यांची व पावसाळी लाईनची पाहणी केली. त्यामध्ये गेल्या आठवड्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला होता, त्यानुषांगे पाहणीमध्ये कळस येथील ग्रेप सेंटर मधून येणाच्या नाल्यावरील कल्वर्टची पाहणी केली,. सदर नाल्याचे खोलीकरण करणे व कल्वट साफ करनेच्या सूचना त्यांनी संबधीतांना दिल्या.
धानोरी रस्त्यावरील लक्ष्मी पार्क येथे लष्कराचे शुटिंग रैंज परिसरातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी, माती, राडारोडा वाहून आला होता, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जूनी घरे आहेत व नाल्याचे पात्र अरुंद आहे, त्या ठिकाणाचे तातडीने रस्त्यावरील राडारोडा हटवून, पावसाळी लाईन साफ करणेत आली व ज्यादा लाईन जोड़न, लोखंडी पावसाळी जाळ्या टाकनेचे काम हाती घेणेत आले आहे.
मा. लष्कराचे अधिकारी यांचेशी बोलून त्याचे हद्दीतील पावसाचे पाण्याचे नियोजन करणेच्या सूचना संबंधित अधिकारी यांना मा.महापालिका आयुक्त यांनी दिल्या. गंगा अरिया या सोसायटी जवळील नाल्याची भित पावसाचे पाण्याचे प्रेशर मुळे ढासळली, त्याची पाहणी बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे सोबत मा.आयुक्त यांनी केली, त्यावेळी सोसायटी मधील नागरिक यांनी त्याच्या अडचणी मांडल्या.त्याबाबत संबंधित अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करणेबबत सूचना त्यांनी केल्या,
सदर च्या सर्व ठिकाणांच्या पाहणीसाठी मा. महापालिका आयुक्त यांचे समवेत मा. पृथ्वीराज बी. पी. अति महा आयुक्त (ई),मा.अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता -पथ विभाग, मा.किशोरी शिंदे उप आयुक्त , परिमंडळ क्र १, मा.श्री. गव्हाणे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, मा.दिनकर गोजारे अधीक्षक अभियंता, मलनिः सारण देखभाल - दुरुस्ती, व इतर म.न.पा अधिकारी उपस्थित होते.