परदेशी विद्यार्थ्यांची 'बकरी ईद ' रविवारी आझम कॅम्पसमध्ये



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : दूरदेशातून   शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या  विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांची बकरी ईद (ईद -अल -अजहा )रविवार,दि.१६ जून रोजी  सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये साजरी करण्यात येणार आहे.पुणेस्थित  परदेशी विद्यार्थी   एकत्रित नमाजपठण करणार आहेत. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए. इनामदार यांच्या हस्ते या  विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर देण्यात येणार आहे. 

आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याननंतर दहाव्या दिवशी हजला गेलेल्या हाजी लोकांचे नमाजपठण होते आणि बकरी ईद साजरी केली जाते. तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात . पुण्यातही परदेशी विद्यार्थी रविवारी १६ जूनला बकरी ईद साजरी करणार आहेत. घरापासून दूर असणारे विद्यार्थी   ईदच्या दिवशी आझम कॅम्पस मध्ये एकत्र येतात आणि शुभेच्छांची देवाणघेवाण करून  एकमेकांची वास्तपुस्त करतात.  

'ईद-अल -अजहा (बकरी ईद) हा महत्वाचा दिवस  असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले . घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते . एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते . पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते ,हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे ',असे डॉ.पी.ए .इनामदार यांनी पत्रकाद्वारे  सांगितले . 


Post a Comment

Previous Post Next Post