ई-टॉयलेटला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण *आप'चे निषेध आंदोलन*


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : सिंहगड रोड, राजाराम ब्रिज येथील ई - टॉयलेट १५ ते २० लाख रुपये खर्चून  मोदी सरकारच्या काळामध्ये बांधण्यात आलेल्या टॉयलेटची दुरावस्था , नागरिकांच्या गैरसोई होणाऱ्या या टॉयलेट मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे,

 महापालिकेकड सरकारने मेंटेन ठेवण्यासाठी दिलेली जबाबदारी महापालिका ही पूर्ण करत नसून, नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी व खासदारांच्या निधीमधून टक्केवारी काढण्याचा खूप मोठा भ्रष्टाचार या टॉयलेटच्या माध्यमातून निदर्शनास येतो, असा आरोप आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी मोदी सरकार वर केला

सदरील ई - टॉयलेटचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून हार घालून पूजन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर , सतीश यादव, युवा अध्यक्ष अमित मस्के, प्रशांत कांबळे किशोर मुजुमदार काका व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post