पावसाळ्यात पुणेकरांना सुरक्षीत जीवन जगण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्यात...


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरात शनिवारी झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली.पुणे शहरात अनेक भागात गुढग्या पर्यंत काही भागात कमरे इतके पाणी साचून पुणे शहर पाण्यात गेल्याचा अनुभव सर्वानीच घेतला. पुणे शहराच्या रस्त्यावर पूर आल्याने म न पा च्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. 

पुणे शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागात रस्ते चौक जलमय झाले अनेक घरांमध्ये पाणी घुसले,झाडे पडली,वाहतुक कोंडी, सिग्नल यंत्रणा बंद पडली.आपली प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थपन कक्ष कागदावरच कार्यावीत असल्याचे दिसले.सामान्य पुणेकर आपला जीव मुठीत धरून सुरक्षीत ठिकाणी पोहचण्याचा जिद्दीने प्रयत्न करीत होते आपल्या या ढिसाळ नियोजनाने कोंढव्यात मुलीचा बळी घेतलाच परंतु प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीने कोणतीही जबाबदारी घेतली नाही उलट या घटनेवर कारणमीमांसा देण्याचा खोटा दावा प्रशासन करीत आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कार्यपद्धतीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करीत आहे.

पुणे शहरात हवामान खात्याच्या अंदाजा नुसार मोठ्या प्रमाणत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाने एक बळी गेला अजूनही प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत पुणेकरांचे अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सदरच्या पत्राद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने मागणी करण्यात येते कि पुणे महानगर प्रशासनाने प्रथम पुणे करांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी म न पा चे सर्व प्रमुख अधिकारी,क्षेत्रीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकाऱ्याचे नावे फोन नंबर घोषीत करून या पुढे येणाऱ्या पावसाळ्यात पुणेकरांना चांगली नागरी सेवा देऊन सुस्त व्यवस्थेचा नाहक बळी जाणार नाही 

पुणे शहरात झालेल्या पावसात जिथे जिथे पुणे तुंबले होते तेथे त्वरित पावसाळी गटारे किंवा त्याभागातील नाले वाहते करा सदरच्या नाल्यावरील अतिक्रमणे त्वरित हटवा . अन्यथा मनसे भविष्यात पुणे तुंबले तर त्याच पाण्यात प्रशासनाला उभे करेल.त्यानंतर उदभवणाऱ्या परिथितीस आपणच जबाबदार असाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी हि विनंती.


साईनाथ संभाजी बाबर 

पुणे शहर अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post