प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ जीव धोक्यात घालून मुलं-मुली रील्स बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मुलांवर कारवाई करण्याची मागणी होत असून रील्ससाठी जीव धोक्यात घालू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
व्हायरल व्हिडिओत (Viral video) एक तरुण उंच बिल्डिंगच्या छतावरील टोकावरुन रील शूट करत आहे. यावेळी एक तरुणी बिल्डिंगच्या कडेवरुन खाली उतरते आणि वर असलेला अजून एक मुलगा केवळ एका हाताने तिला पकडतो. यावेळी त्या मुलगा किंवा मुलीने कोणतेही सुरक्षा कवच घातलेले दिसत नाही. मुलीला बिल्डिंगवर लटकताना पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.
व्हिडीओ लिंक :
https://twitter.com/i/status/1803662898453160258