प्रेस मीडिया लाईव्ह :
मोहम्मद जावेद मौला :
पुणे : पूना कॉलेजच्या, क्रीडा विभाग, फिट इंडिया क्लब, राष्ट्रीय सेवा योजना, अंतर्गत गुणवत्ता हमी सेल व ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (+2) व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन पूना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पूना महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी योगासन केले.
पूना कॉलेज मध्ये योगाचार्य ऋत गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी योगाचे विविध प्रकार, सहज योग, आसने, प्राणायाम, ध्यान आदींसह योगाचे फायदे सांगितले व प्रात्यक्षिक दिले. यावेळी पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना ,एनसीसी कॅडेट्सनी योगासने केली.
आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यासाठी जिमखान्याचे उपाध्यक्ष डॉ.मुशर्रफ हुसैन क्रीडा विभागप्रमुख डॉ.अयाज शेख, पूना कॉलेजचे उपप्राचार्य इम्तियाज आगा, पर्यवेक्षक श्रीमती नसीम खान, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.बाबा शेख, महिला कार्यक्रम-अधिकारी वसुधा व्हावळ, राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम- अधिकारी प्रा.शेख अशद , राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम- अधिकारी डॉ.अकबर सय्यद,डॉ. इरम खान, जुबेर पटेल, प्रा. इम्रान मोमीन ,क्रीडाशिक्षक इम्रान पठाण, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी. अधिकारी सब लेफ्टनंट डॉ.मोहम्मद शाकीर शेख यांनी केले व वसुधा व्हावळ यांनी आभार मानले.
Tags
पुणे