प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील आरटीओ कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी पदी अर्चना गायकवाड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. गुरुवारी (ता. १३) सायंकाळी परिवहन विभागाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. राज्यातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांची पदोन्नतीचा आदेश सहा जून रोजी निघाला होता.
पुणे हे राज्यातील आरटीओ कार्यालयांपैकी महत्त्वाचे व सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे कार्यालय म्हणून कार्यालय ओळखले जाते. त्यामुळे या कार्यालयाचा पदभार घेण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते.अकलूज येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या अर्चना गायकवाड यांनी अखेर यात बाजी मारली. जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारीश्याम लोही यांची नियुक्ती चंद्रपूर येथील आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर करण्यात आली आहे.