प्रेस मीडिया लाईव्ह :
मंगळवार दि. २/७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता हडपसर गाडीतळ जवळ, हडपसर येथून दोन्हीही पालख्यांचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थानावेळी मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले पुणे मनपाचे वतीने निरोप देणार आहेत.
वरीलप्रमाणे प्रसंगी मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त यांचेसमवेत मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त, मा. उप आयुक्त, मा. खातेप्रमुख, मनपा वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत.
मनपाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधा-
आरोग्य विभाग- पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाèया वारकèयांच्या आरोग्याची काळजी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जाणार आहे. त्यासाठी फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा पुरविली जाणार आहे. दि. ३० जुन २०२४ रोजी पुणे मनपाचे वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना ) वैद्यकीय अधिकारी , फार्मासिस्ट , नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचारासह पुणे - मुंबई रस्त्यावरील फुले नगर (विश्रांतवाडी), पुणे - मुंबई रस्त्यावरील पाटील इस्ेटट वाकडेवाडी, साखळपीर तालीम येथे उपस्थित राहील व पालखी सोबत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ पोलीस चौकी समोर, रामोशी गेटपर्यंत राहील. व दर्शनाला येणाèया वारकèयांसाठी/ भाविकांसाठी मोफत उपचार करण्यात येतील. पालखी आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत रफी महंमद किडभाई शाळा, भवानी पेठ व मामासाहेब बडदे दवाखाना, नानापेठ येथे प्राथमिक उपचारासाठी २४ तास दवाखाने कार्यरत ठेवण्यात येऊन वारकèयांना मोफत उपचार करण्यात येतील. पुणे जिल्ह्यातील शासकिय व खाजगी रुग्णालयातील १०% बेड्स (खाटा) आरक्षित ठेवणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच दवाखाने, प्रसुतिगृह/रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार दिले जाणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुणे मनपाचे वैद्यकीय पथक पुणे ते पंढरपुर मुक्कामापर्यंत पाठविणेत येणार आहे. सदर वैद्यकीय पथकामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, २ फार्मासिस्ट, १ रायटर, २ नर्सिंग ऑर्डली व १ रुग्णवाहिका चालक यांचा समावेश असेल. या पथकामार्फत पुणे ते पंढरपुर पर्यंत वारकèयांना मोफत प्राथमिक औषधोपचार पुरविण्यात येतील. किटक नाशक विभागामार्फत पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येणार आहे. तसेच पशु वैद्यकीय विभागामार्फत पुणे मनपा हद्दीतील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
पथ विभाग- सोलापूर रोड व सासवड रोड येथील रेलिंग्जची साफसफाई करुन त्यांचे रंगकाम, झेब्रॉ क्रॉसिंग थर्मोप्लास्टिक पेंटींगची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.
पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्यात आलेला असून साफसफाई करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावरील सिमेंट क्राँक्रिटचा भाग सोडून उर्वरीत ठिकाणांचे पॅचवर्कची कामे करण्यात आली आहेत. पालखी आगमनाच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाय योजनांच्या अनुषंगाने पावसाचे पाणी साठणाèया ठिकाणी पादचारी व वारकèयांच्या सोयीसाठी तेथील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या असून त्याबाबत दक्षता घेण्यात आलेली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग-पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाèया कचèयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण ३५० पुरुष सफाई सेवक व २५० महिला सफाई सेविका असे एकूण ६०० सफाई सेवक कार्यरत आहेत. १५ क्षेत्रिय कार्यालयामध्ये एकूण अंदाजे १६९० पोर्टेबल व फिरते शौचालयाची सोय करण्यात आलेली असून दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत महिला वारकèयांसाठी आवश्यतेनुसार मनपा शाळेत व खाजगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय व महिलांसाठी न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर व वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २,६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७,५०० किलो कार्बोलिक पावडर व ११,२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर इत्यादी पुरविण्यात येणार आहे. महिला वारकèयांसाठी ५०,००० सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण विभाग, गलिच्छ वस्ती निमूर्लन विभाग, विद्युत विभाग, वाहन विभाग,भवन रचना, ड्ेनेज, पथ विभाग, आरोग्य, अतिक्रमण, उद्यान, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध विभागांनी जय्यत तयारी केलेली आहे.