'ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिनानिमित्त कार्यशाळा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : इंटरनॅशनल लॉन्जएटिव्हिटी सेंटर (इंडिया) आणि भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेजच्या वतीने आणि घरडा केमिकल्सच्या सहकार्याने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक तसेच इंटरनॅशनल लॉन्जएटिव्हिटी सेंटर (इंडिया)चे अध्यक्ष जयंत उमराणीकर,यशोदा पाध्ये,अंजली राजे यांनी उदघाटन सत्रात मार्गदर्शन केले.भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्ज्वला बेंडाळे अध्यक्षस्थानी होत्या.एकूण चार सत्रात ही कार्यशाळा झाली.ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे कायदे,ज्येष्ठ नागरिकांचे छळ,जनजागृती,कायद्यातील त्रुटी याबद्दल मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या सत्रांमध्ये एड.डॉ.राजेंद्र अनुभुले,एड.रोशनी तांदळे,डॉ.अंजली देशपांडे,डॉ.उदय वारुंजीकर आदी मान्यवर सहभागी झाले.
'ज्येष्ठ नागरिकांचा छळ हा दखलपात्र गुन्हा असून नागरिकांच्या छळाला प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांमध्ये प्रयत्न केले पाहिजेत' असे मत जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केले.डॉ.उज्ज्वला बेंडाळे म्हणाल्या,'ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी असेल तर त्यांना विनामूल्य कायदेशीर मदत देण्याचे नियम आहेत.तसेच मेटेंनस वेल्फेअर ऍक्ट २००७ मधील कलम २४ विषयी जागृती घडवून आणली पाहिजे.त्यातून ज्येष्ठ नागरिकांच्या छळाला प्रतिबंध बसण्यास मदत होईल.