प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणेकरांचा प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर खासदार होणार हे निश्चित आहे. एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
पुण्यातील जनता आघाडीच्या पाठीशी होती आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला प्रचारात आला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमताने धंगेकरांचा प्रचार केला. पदयात्रा, कॉर्नर सभा आदींमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी धंगेकरांना पाठिंबा देत त्यांनी खासदार व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
पुणेकरांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येईल, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी. पत्रकाद्वारे म्हटले आहे. महाराष्ट्रातील भाजप पक्ष फोडण्याचे राजकारण, पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती, हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी याबाबत पुणेकर जनतेमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी होती. गेल्या दहा वर्षांपासून केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता असूनही भाजपने पुण्यासाठी एकही महत्त्वाची योजना राबवलेली नाही. पुण्यातील जनतेचा रोष मतांच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. पुण्यातील जनतेने रवींद्र धंगेकर यांना खासदार म्हणून स्वीकारले आहे. एक्झिट पोल अनेकदा चुकीचे ठरले आहेत.