काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभवामुळे काँग्रेस भवनात शुकशुकाट

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : लोकसभेच्या जागेसाठी  झालेल्या  लढतीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस भवना मध्ये शुकशुकाट पसरला होता कारण  हा पराभव जिव्हारी  लागण्या सारखाच आहे काँग्रेसच्या उमेदवाराचा पुण्यातून हा सलग तिसरा पराभव  पत्करावा लागला आहे . हा पराभव सर्वाँना विचार करावा लावणारा आहे. 

भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली तर, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करणाऱ्या धंगेकर यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास दाखविला. धंगेकर यांच्यामागे काँग्रेसने राज्यातील पूर्ण ताकद उभी केली. राज्यात पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणुका झाल्या. 

काँग्रेसचे तेथील राज्य पातळीवरील सहा आजी-माजी आमदार पुण्यात दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचार यंत्रणेला वेग आला. दररोज काँग्रेस भवनात कार्यकर्ते, नेते, पक्षाचे समर्थक यांची लगबग सुरू होती. विविध नेत्यांच्या पत्रकार परिषदा, निवडणुकीचे नियोजन, त्यासाठी आवश्यक व्यवस्था यामुळे काँग्रेस भवन परिसर गजबजला होता. आज सकाळपासून धंगेकर पिछाडीवर असल्याची माहिती पुढे येऊ लागली. मतमोजणीच्या एकेका फेरीनंतर मोहोळ यांना आघाडी मिळू लागली. त्याचा थेट परिणाम काँग्रेस भवनावर दिसू लागला. कार्यकर्ते, नेते यांनी काँग्रेस भवनाकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या शहर पातळीवरील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात हजेरी लावली होती. 

काँग्रेस भवनात यंदा विजयाचा गुलाल उधळला जाणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. त्याची जय्यत तयारीही केली होती. काँग्रेस भवन पंधरा वर्षांनंतर विजयाच्या गुलालाने रंगणार, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे तेथे आलेल्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्ट दिसत होती.

Post a Comment

Previous Post Next Post