NEET परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करा; "आप"ची मागणी.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्या विरोधात आंदोलन केले गेले तसेच दोशींवर कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील पक्षाच्या वतीने केली गेली. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना NEET ची परीक्षा देणे अनिवार्य असते. 4 मे 2024 रोजी झालेल्या याच परीक्षेसाठी देशभरातून साधारणता 24 लाख विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. सदर परीक्षेचा निकाल 4 जून 2024 रोजी NTA या संस्थेमार्फत जाहीर करण्यात आला असून हा जाहीर केलेला निकाल आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, कारण निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाल्याचे उघड झाले आहे त्यामुळे याबाबत सर्वचं स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निकाल जाहीर करताना एनटीए या संस्थेने एकूण 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये असून सुप्रीम कोर्टाने ही याबाबतची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळल्याने  NEET ची परीक्षा पुन्हा घेण्यास सांगितल्याचे समजते. विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस मार्क्स हे 2 किंवा 5 नसून, ते 100 ते 150 पर्यंत दिले गेले असल्याने अनेक मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकणारे विद्यार्थी मागे पडून ग्रेस मार्क्स मिळवलेले विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये पुढे गेले आहेत. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा या प्रकारामुळे समाजात तसेच विद्यार्थ्यांत चुकीचा संदेश पसरत असून या प्रकाराचे दुर्गामी परिणाम संपूर्ण समाजालाच भविष्यात भोगावे लागतील. ग्रेस मार्क्स मिळवलेले विद्यार्थीच भविष्यात डॉक्टर होऊन अनेकांचे उपचार करणार आहेत, त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेवर संशय निर्माण झाला आहे. ठराविक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिल्यामुळे अनेक विद्यार्थी जे सरकारी कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवू शकत होते, ते ऍडमिशनच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत व त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झालेला आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने देखील ग्रेस मार्क्स देण्याच्या एनटीए च्या पद्धतीवर ताशेरे ओढत NEET ची परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यास सांगितले आहे. 

NEET परीक्षेतील घोटाळ्याचा हा सर्व प्रकार पाहता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे नक्की काय चालले आहे? असा प्रश्न विचारतानाच, परीक्षा घेणाऱ्या संस्थांवर त्यांचा कोणत्याही प्रकारे वचक नसल्यामुळेच असे पेपर फुटीचे प्रकार घडत असल्याचा आरोप, असे यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताना परीक्षांचे पेपर फोडण्याच्या, तसेच चुकीच्या पद्धतीने वाढीव मार्क देऊन अनेक मुलांना पास करण्याचा प्रयत्न म्हणजे समाजाला चुकीच्या दिशेकडे नेण्याचा प्रकार असून या घटनेत दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोरात कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने केली गेली. ग्रेस मार्क्सच्या घोटाळ्यामुळे जे विद्यार्थी खरचं अभ्यास व मेहनत करून चांगले मार्क मिळवू पाहतात त्यांच्यावर अन्याय का केला जात आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.

_दिवसेंदिवस परीक्षा घोटाळ्यात वाढ होत आहे ह्या घोटाळ्यांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनाकारण मनस्ताप होत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पेपर फुटीच्या तसेच परीक्षेतील गैरप्रकारांच्या गोष्टींची दखल घेऊन अशा प्रकारे परीक्षा घोटाळा किंवा पेपर लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारे कायदे अमलात आणले पाहिजेत._*

_-अजित फाटके (पाटील) कार्याध्यक्ष आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्य_

_नीट परीक्षेतील घोटाळा म्हणजे पैसेवाल्यांनी स्वार्थासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर केलेली कुरघोडी आहे. अशाप्रकारे वैद्यकीय क्षेत्रातही भ्रष्टाचार आपला शिरकाव करू पाहत आहे. देवानंतर डॉक्टर हीच म्हण आत्तापर्यंत प्रचलित होती पण आता याच डॉक्टरांचा देवपण अशा घोटाळ्यांनी लयाला जाणार आहे. या सर्व प्रकाराची  उच्चस्तरीय चौकशी केली जावी._

_-सुदर्शन जगदाळे शहराध्यक्ष आम आदमी पक्ष_

आजच्या आंदोलनास अजित फाटके (पाटील), राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर , अमित म्हस्के,निरंजन अडागळे, यल्लाप्पा, चंद्रमणी जावळे, मीना जावळे,सुरेखा भोसले,शितल कांडेलकर ,सुरज सोनवणे, मनोज शेट्टी, विशाल शेलार, शब्बीर शेख , अनुददीन कादरी,प्रशांत कांबळे , आसिफ बागवान, उमेश बागडे ,किरण कांबळे, इरफान रोड्डे, अजय पैठणकर,निखिल खंदारे,ॲड गणेश थरकुडे, नौशाद अन्सारी , खुशबू अन्सारी,कुमार धोंगडे , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

Previous Post Next Post