हीच स्मार्ट सिटी आहे का ? नागरिकांना पडला प्रश्न....



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यात शनिवारी दुपारनंतर झालेल्या  मुसळधार पाऊसा मुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडाली होती तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. हीच स्मार्ट सिटी आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे 


  पुणे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराची देखील आता पोलखोल झाली आहे.

पावसाळा वाहिन्या सफाइचे काम क्षेत्रिय कार्यालयानी एप्रिलमध्ये सुरू केले होते. या कामांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालय स्तराव प्रत्येकी स्वंतत्र निविदा काढण्यात आली होती. त्यानंतरही मे महिनाअखेरपर्यंत उपगनरांतील ८४ कि.मी.लांबीच्या पावसाळी गटारांची आणि १४ हजार चेंबरच्या स्वच्छतेचे काम बाकी होते. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यामुळे 15 क्षेत्रिय कार्यालय स्तारावरील कारभारही उघडा पडला आहे.

         नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच-- रविंद्र धंगेकर  


या बाबत रविंद्र धंगेकर म्हणाले की , आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे. पुढच्या 50 वर्षांचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे. प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत, असे म्हणत रविंद्र धंगेकरांनी महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत . 

शनिवारी पुण्यात जोरदार पाऊस होणार, असा हवामान खात्याने इशारा दिला होता. त्याचीही दखल महानगरपालिका प्रशासनाला घ्यावीशी वाटली नाही, याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post