विधानसभा निवडणुकीत मशाल हाती घेवुन हडपसर जिंकण्याचा महादेव बाबर यांचा निर्धार


प्रेस मीडिया लाईव्ह :

हडपसर विधानसभा जिंकण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी  आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल हाती घेवुन हडपसर जिंकण्याचा निर्धार  केला आहे .मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधान सभेसाठी आता कामाला लागा अशा सूचना दिल्याचे महादेव बाबर यांनी सांगितले

कोंढवा येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना महादेव बाबर म्हणाले की, हडपसर मतादरसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून.  आजही सर्व सेनेचे निष्ठावंत पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांसोबत आहेत. आदेश मिळताच हाती मशाल घेऊन हडपसरचा गड सर केल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. महाविकास आघाडीची वज्रमुठ लोकसभा निकालानंतर तर अधिकच घट्ट झाली आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे, महादेव बाबर यांनी    सांगितले.

  याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमोल हरपळे, युवासेना समन्वयक प्रसाद बाबर, सागर जगताप, अमर कामठे, महेंद्र भोजणे आदी उपस्थित होते.

महादेव बाबर म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून मी सत्तेत नसलो तरी सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवित आहे. सत्ताधारी आमदारांनी हडपसर मधील वाहतूक कोंडी, कात्रज बाह्यवळण मार्ग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे. जनतेला आता केवळ आश्वासने नको , काम हवे आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत. त्या मुळे या वेळी हडपसर विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत विजयाची मशाल पेटविण्याचा ठाम निर्धार बाबर यांनी केला आहे.

 हडपसर विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत विजयाची मशाल पेटविण्याचा ठाम निर्धार बाबर यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post