प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : बनावट बिले तयार करून महिला ट्रॅव्हल मॅनेजरने कंपनीची ५६ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नीना सिंग (रा.विमाननगर) असे ट्रॅव्हल मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविचंद्र टंगीराला (४२ रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांत या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०२३ ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब येथील व्हॅरोक इंजिनिअरिंग कंपनीत घडली.
नीना सिंग व्हॅरोक इंजिनिअरिंग कंपनीची ट्रॅव्हल मॅनेजर आहे. तिने पदाचा गैरवापर करून हॉटेलच्या जेवणाचे १२ हजार ३९० रुपये व विमाननगर येथील हॉटेलमध्ये न राहता त्याचे ४९ हजारांचे बनावट बिल तयार केले,तसेच कंपनीशी संबंधित नसणाऱ्या तिघांचे विमानाचे तिकीट काढून कंपनीची ४ लाख ७२ हजार ८९० रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करत आहेत.