नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार --पोलीस आयुक्त अमितेश कुमार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांची अडवणूक करून त्यांच्याकडून चिरीमिरी उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. यापुढे जर नागरिकांकडून पैसे घेताना वाहतूक पोलीस आढळून आले तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

 चौकात आणि रस्त्यांवर उभे राहण्याऐवजी वाहतूक पोलीस आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जणांच्या गठ्ठयाने एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमाखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते त्यावेळी वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. चिरीमिरी घेऊन वाहन चालकांना सोडून दिले जाते

कशी केली जाणार कारवाई?

पोलीस आयुक्तांनी या कारवाईकरिता काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे पोलीस कर्मचारी साध्या नागरी वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरणार आहेत. वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का? याची या पथकाकडून पाहणी केली जाणार आहे. असा गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post