ससून रुग्णालयातील भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर येऊ लागला ..


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : ससून रुग्णालयातील  भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.  भ्रष्टाचाराचे  कुरण बनलेले  ससून हॉस्पिटल मधील  डॉक्टर गब्बर होत चालेले आहेत . काही दिवसांपूर्वी ड्रग माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये अनेक दिवस उपचाराचा नावाखाली ड्रग रॅकेट चालवत होता यामुळे ससून रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर टांगले गेले  आहेत . 


काही दिवसा  पुर्वी उद्योगपती पुत्र काल्याणी नगर  दुहेरी बळी प्रकरणी पोर्शे कार अपघात प्रकरणात सुद्धा या डॉक्टरांनी केलेला भ्रष्टाचार  समोर आलं आहे. त्यामुळे ससुन हॉस्पिटल चे नाव खराब होत आहे .  हे हॉस्पिटल खरोखरच गरिबांसाठी आहे की धन दांडग्यांसाठी आहे  असा प्रश्न सर्वांना पडला आहे .

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या  अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली होती .

आता ससूनच्या डॉक्टरांनी खाजगी मेडिकल वाल्यांशी दुकानदारी थाटल्याचा  धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकल मधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पोलिस केस मध्ये अडकवण्याची धमकीही या डॉक्टरने दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली डिस्चार्ज करते वेळी मात्र न्युरोसर्जरी विभागातील निवासी डॉ. किरण याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकल मधून आणण्यास सांगितले.तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी कोंढव्यातील जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लोकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डॉक्टर हा रुग्णाच्या नातेवाइकांना पैसे मागताना दिसत आहे. आता ससून मधून नव्याने समोर आलेल्या या धक्कादायक प्रकाराला पाठीशी घातलं जाणार की कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे नवनवीन कारनामे रोजच पुढे येत आहेत यामुळे लोकांचा ससुन रुग्णालयावरील विश्वास हरता कमी होताना दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post