प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे विशेष प्रतिनिधी :
पुणे : मुंबई पुणे रोड (बोपोडी)..जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा उत्सवामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने आलेल्या लाखो वारकरी भक्तांचे पाणी वाटप करून स्वागत करण्यात आले या पालखी सोहळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम आपण एकच मानवता धर्म मानणारे आहोत असा राष्ट्रीय ऐकात्मतेचा संदेश देण्यात आला..
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या महिला प्रदेश अध्यक्षा गौसिया खान,संघटनेच्या सदस्या सौ.शकीलाताई फिरोज मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते राजेश रेड्डी, जराल्ड डिसोझा,श्रावणी कांबळे, प्रियाताई, बराक फिरोज मुल्ला यावेळी आदी मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित होते