न्यू पुना कोल्ड्रिंकच्या उत्पादनावर प्रश्न चिन्ह...? अन्न भेसळ खात्याने चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : मुस्लिम परिसरात व्यवसाय करणारा, ज्याचे 70 ते 80 टक्के ग्राहक हे मुस्लीम आहेत ,तसेच मुस्लिम समाजाबद्दल मनात द्वेष ठेवून सोशल मीडियावर मुस्लिमां विरोधात पोस्ट करणारा पूना कोल्ड्रिंक चा मालक लाच्चू दनवाणी याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पूना कोल्ड्रिकचे उत्पादन हे मुस्लिमांचे धर्म भ्रष्ट तर करणारे नाही ना असे अनेक प्रश्न पुणे शहरातील मुस्लिम ग्राहकांनी उपस्थिती केले आहे

मुस्लिम धर्मियांचे धर्म भ्रष्ट करण्यासाठी कोणकोणते षडयंत्र रचले असतील याची चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकरणी अनेक संघटना फूड विभागात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी प्रेस मीडिया लाईव्ह शी बोलताना सांगितले तसेच सदरील डेअरी मधील सर्व उत्पादनाची व मालक कामगारांची अन्न भेसळ खात्याने चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post