विशेष बातमी : थायलंड विद्यापीठातर्फे डॉ. तुषार निकाळजे यांना पुरस्कार प्रदान...

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

शिणावात्रा विद्यापीठ, थायलंड यांनी  व्हिएतनाम, श्रीलंका, भारत,  थायलंड, नेपाळ  या देशांतील विविध संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान केला. यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. तुषार निकाळजे या संशोधकास त्यांनी केलेल्या कार्याबद्दल "प्राइड ऑफ एज्युकेशन"  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. तुषार निकाळजे हे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते वर्ष 2022 मध्ये सेवानिवृत्ती झाले. 

सेवा निवृत्ती पूर्वी डॉ. निकाळजे यांनी अकरा पुस्तके लिहून प्रकाशित केली. त्यामधील त्यांची निवडणूक विषयावरील दोन पुस्तके 9  विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांना मान्यता प्राप्त आहेत. तसेच त्यांनी दृष्टीहीन व्यक्तींकरिता "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे इंग्रजी-  ब्रेल भाषेतील पुस्तक लिहून प्रकाशित केले. या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली  आहे. डॉ. निकाळजे यांनी दोन राज्यस्तरीय व चार आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. चेन्नई, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, लंडन, अमेरिका असे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 16  पुरस्कार प्राप्त आहेत. वर्ष 2023 मध्ये त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. निकाळजे यांचा हा प्रवास  आजही अखंड चालू आहे. 

सेवा निवृत्ती नंतर डॉ. निकाळजे यांनी 18 लेख, 3 पुस्तके लिहून प्रकाशित केली आहेत. दोन आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये भाग घेतला आहे. त्यांनी तीन प्रोत्साहन पर माहितीपट (डॉक्युमेंटरी) यांची निर्मिती केली आहे. या  डॉक्युमेंटरीमध्ये क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड,  बिहाइंड द व्हाईट कॉलर, रिटायर्ड  बट नॉट टायर्ड  यांचा समावेश आहे. वरील सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कामे डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केली आहेत. वरील सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन शिनावात्रा विद्यापीठ, थायलंड यांनी डॉ. निकाळजे यांना प्राइड ऑफ एज्युकेशन हा बहुमान प्रदान केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post