पुण्यात पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट

 पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या आशीर्वादाने अनाधिकृत होर्डिंग जोमात

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- पुणे आणि घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसारखी पुनरावृत्ती होवू नये यासाठी महानगरपालिका त्यांच्या हद्दीतील नियमबाह्य जाहिरात फलक हटविण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले असले तरी हा केवळ दिखावा आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाने गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या जागेतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेला वारंवार केली असून देखील आजतागायत कोणत्याही होर्डिंगवर कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हि माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे महागरपालिकेने पंधरा दिवसाच्या आत या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी दिला आहे. 

अनंत घरत म्हणाले की, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये जाहिरातीसाठी मोठ मोठे होर्डिंग उभारले जातात आणि दुर्घटना घडल्यावर ते अनधिकृत होते कायद्याचे पालन केले नाही म्हणून कारवाई होते. पण ६ वर्षाहून जास्त काळ होऊनही पुणे मनपा आकाशचिन्ह विभाग कुंभकर्णासारखा झोपला असल्याचे दिसून येते. खडकवासला पाटबंधारे विभागाने १८ सप्टेंबर २०१८ ला पुणे मनपा आयुक्त यांना पत्र देऊन अनधिकृत होर्डिंग धारकांची नावे पाठवून दिली होती आणि त्यांचा परवाना नूतनीकरण करू नये असे कळविले असतानादेखील आकाशचिन्ह विभागाने आजतागायत ६ वर्षे उलटूनही सदर अनधिकृत होर्डिंग वर कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. 

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खडकवासला पाटबंधारे विभागाची कॅनॉल आणि परिसरातील जागा हि महानगरपालिका हद्दीतील खडकवासला ते लोणीकाळभोर पर्यंत आहे. महानगरपालिकेचे विविध क्षेत्रीय कार्यालये या हद्दीत आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगबाबतची कारवाई बाबत माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे सहाय्यक आयुक्त आणि आकाशचिन्ह विभागातील अधिकारी देतात. हा केवळ वेळकाढूपणा असून अनधिकृत होर्डिंगला अभय देण्याचे आहे. सद्यस्थितीत पाटबंधारे विभागाच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग संदर्भात कोर्टात सुरु असलेली केस मधील स्थगिती आदेश उठला असून कारवाईचा मार्ग मोकळा असतानादेखील कोणाच्या आदेशाची व आणखीन किती नागरिकांच्या मृत्यूची वाट प्रशासन पाहत आहे. असा संतप्त सवाल घरत यांनी केला आहे. 

कळावे

अनंत रामचंद्र घरत

प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे . 

सोबत कागदपत्रे

१) लेखी तक्रार 

२) पाटबंधारे विभागाचे २०१८ चे पत्र

३) अनधिकृत होर्डिंग ची लिस्ट 

३) अनधिकृत होर्डिंग चा फोटो

Post a Comment

Previous Post Next Post