प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.पुण्याच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागले होते . पुणे लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीने झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे लोकसभेच्या रिंगणात होते.देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारत इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.
अनेक मुद्द्यांनी पुणे लोकसभा मतदार संघातील वातावरण प्रचारा दरम्यान तापले होते. त्यामुळे निकालाकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. आज मुरलीधर मोहोळ विजय घोषित होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष पुण्याच्या विविध भागात जल्लोष केला.
मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना कसब्यात धोबीपछाड केले. रविंद्र धंगेकर यांना १२,९०० मतं तर मुरलीधर मोहोळ यांना १७,७५० मतं मिळाली. मुरलीधर मोहोळ कसबामधून ४८५० मतांनी आघाडीवर आहेत. वसंत मोरे ५००० च्या आसपास आहेत. मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. सध्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते गुलालाची उधण करत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करत आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष शिगेला पोहचला आहे. निकाल जाही होण्याआधीच कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत.