काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे पारडे जड




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  काँग्रेस उमेदवार रवींद्र  धंगेकर आणि भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट लढत झाली. शिवाय वंचितचा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरला. मनसेतून वंचित मध्ये गेलेले वसंत मोरे हे वंचितचे उमेदवार होते. पुण्यामध्ये यावेळी साधारण ५३ टक्के मतदान झाले , तसे पाहता काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे पारडे जड दिसत आहे . 

या लोकसभा निवडणुकित प्रचारा दरम्यान तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी कंबर कसून जोरदार प्रचार केला. त्याच सोबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील केले. या मतदारसंघामध्ये पुणेकरांची पसंती नेमकी कोण असणार आहे आणि त्यांनी कोणाला जास्त मतदान केलं हे चित्र येत्या ४ जूनच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे .भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली होती. तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची पुण्यामध्ये सभा झाली होती. 

भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. तर काँग्रेसही मागे न हटता त्यांनी देखील जबरदस्त प्रचार केला. वसंत मोरे यांनी देखील पुण्यात जोरदार सभा घेत प्रचार केला.  या मतदारसंघामध्ये खरी लढत भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्या मध्ये झाली. मतदारांचा कौल रविंद्र धंगेकर यांचे कडे जास्त असल्याचे दिसून येत आहे. पुणे कराना  आक्रमक खासदाराची गरज आहे अशी चर्चा सुद्धा सुरू आहे

Post a Comment

Previous Post Next Post