प्रेस मीडिया लाईव्ह :
महाराष्टाच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत आहेत. एकीकडे एनडीएकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत.काही जणांकडून विजयाचा जल्लोष केला जातोय. तर काही ठिकाणी पराभवावर नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विविध पक्षांच्या नेते मंडळींच्या भेटीगाठी सह जोरदार चर्चा सुरु आहेत.
देवेंद्र फडणवीस सत्तेतून बाहेर पडणार काय...?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव हा खूप जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा आणि पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे.
अपक्ष विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा
सांगली लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले विशाल पाटील यांनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील यांनी दिल्लीत जावून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम देखील होते. विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. विशेष म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट करत विशाल पाटील यांच्या पाठिंब्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली
राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला निकाल आता लवकरच्या पुढच्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचीदेखील मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी आहे. याचबाबात देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षश्रेष्ठींसोबत बोलू शकतात.