प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित "कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड्.)पेठ वडगाव" येथे शुक्रवार,दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून योगातज्ञ आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. अनिकेत केरबा कापडे यांनी छात्राध्यापकांना योग विषयक प्रशिक्षण दिले आणि छात्राध्यापकांनीही त्याला उत्स्फूर्त सहभाग दिला. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निर्मळे आर.एल.मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तसेच त्यावेळी प्रा.शिरतोडे व्ही.एल.,प्रा. डॉ.पवार ए.आर.,प्रा. सोरटे एस.के., प्रा.सावंत ए.पी., प्रा.कर्णिक वाय. ए.तसेच ग्रंथपाल चौगुले एस. एस. व पाटील पी. व्ही.उपस्थित होते.
प्रशिक्षक अनिकेत कापडे यांनी सर्व छात्राध्यापकांना योगाचे महत्त्व पटवून देत योगा विषयक योग्य ती माहिती व प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व छात्राध्यापकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अशाप्रकारे 21 जून रोजी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्कृष्टरित्या साजरा करण्यात आला.