स्वर्गीय श्री. अशोकराव माने यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव संस्थेचे संस्थापक श्री.स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दिनांक 12/06/ 2024 रोजी कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड्. पेठ वडगाव  येथे प्राचार्या निर्मळे  आर.एल. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्टाफ यांनी कॉलेज प्रांगणात वृक्षारोपण केले. 

स्वर्गीय श्री. अशोकराव माने साहेब यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणा मध्ये वृक्षारोपण करून  भविष्यातील निसर्गाप्रतीची  जाणीव व साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर अंबप येथे स्वर्गीय श्री. अशोकराव माने साहेबांच्या स्मृतीस्थळासही भेट देऊन सर्वांनी अभिवादन केले. स्मृतीदिनाच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी आपला सहभाग नोंदविला.

Post a Comment

Previous Post Next Post