भावपूर्ण श्रद्धांजली
प्रेस मीडिया लाईव्ह :
भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री अनंतराव कळंबळकर यांचे काल १६ जुन २०२४ रोजी सकाळी वृद्धापकाळाने विले पार्ले मुंबई येथे घरी दुःखद निधन झाले. ते 94 वर्षाचे होते . मूळचे नागपूरचे असलेले अनंतराव BSNL मध्ये कामाला होते. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दत्तोपंतांचे ठेंगडीजींचे ते बालमित्र होते. अनेक वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर काम केले.
त्यानंतर मुंबईमध्ये भारतीय मजदूर संघ मुंबईचे ४० वर्षाहून अधिक काळ काम केले. अनेक वर्ष मुंबई अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने त्यांनी भारतीय मजदूर संघाचे काम उभे केले. श्रीनिवास मिल मधील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ लढा त्यांच्या नेतृत्वामुळेच यशस्वी झाला. तसेच एअर इंडिया मधील रोंजदारी कामगारांना नोकरीत कायम करण्यासाठी केलेला लढाही यशस्वी झाला. भारतीय मजदूर संघ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला.
भारतीय श्रम शोध मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कठोर पण प्रेमळ स्वभावाचे, मजदूर संघाच्या कामात समर्पित भावनेने तन मन धन देऊन काम करणारे, निष्ठावंत कर्मठ कार्यकर्ते श्री अनंतराव करंबेळकर यांचे मजदूर संघातील काम कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देईल.त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा अमेरिकेत असतो. आज दि 17 जुन रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार संस्कार करण्यात आले आहेत . त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करीत आहोत.
त्यांच्या जाण्याने भारतीय मजदूर संघाचा स्थापनेपासून कार्यरत असणारा, चालता बोलता इतिहास आपल्यातून दूर गेलेला आहे. स्वर्गीय अनंतरावांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना अशी श्रध्दांजली भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकी पुणे येथे चालू आहे या वेळी श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यकारिणी बैठकी मध्ये भारतीय मजदूर संघ अखिल भारतीय अध्यक्ष मा हिरण्यमय पंड्या, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, क्षेत्रीय संघटन मंत्री सी व्ही राजेश व विविध जिल्हा मधील पदाधिकारी उपस्थित होते.