"स्त्री गर्भाशयाच्या पीसीओएस आजाराच्या निदानाची शोधली पहिली किट"
प्रेस मीडिया लाईव्ह :
नांदेड - येथील मनाली गौतम दामोदर (सध्या रा.सांचीनगर ,तरोडा.मुळ गाव चिंचगव्हाण ,ता.हदगाव ) हिने आपल्या कौशल्याच्या जोरावर संशोधनात अदभुत आणि असामान्य कामगिरी केली आहे.
मनालीचे बारावी प्रर्यत शिक्षण झाले असून तिने आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे असलेल्या इंडियन इंन्सिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अय्ंड रिसर्च सेंटर येथे बँचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षांचा पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रम पुर्ण करीत असताना मनाली दामोदर हिने महिलांच्या गर्भाशयाच्या पीसीओएस या गंभीर आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने यशस्वी केलेल्या प्रयोगात चक्क जागतिक पातळीवर नावलौकीक मिळवून त्यांच्या टिमने सुवर्णपदक पटकावले.यामुळे नांदेडच्या या सांयटिस्ट कन्येने संशोधनात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा भिम पराक्रम केल्याने तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.