महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2024





प्रेस मीडिया लाईव्ह :

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान झाले. पाच टप्प्यात झालेल्या या मतदानानंतर राज्यातील जनतेला मतमोजणीचे वेध लागले होते. राज्यातील सर्वच मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना झाला.

राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून बारामती लोकसभा मतदार संघ ठरली. या ठिकाणी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यातच लढत झाली. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात होत्या. आता ४८ मतदार संघात काय लागणार निकाल… त्याची उत्सुक्ता राज्यातील जनतेला आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला असून पोलमध्येही दिसून आलं. मात्र आज निकालामध्ये सर्व काही स्पष्ट होणार असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढत बारामती मतदारसंघात आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार की विद्यमान खासदार सुप्रिया सुळे? बारामतीकरांनी पसंती कोणाला?हे स्पष्ट होणार आहे. त्यासोबतच पुण्यात होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये रविंद्र धंगेकर की मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे, तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली होती. 

पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 12 लोकसभा मतदार संघ असून त्यामधील सात लढतींकडे विशेष लक्ष असणार आहे. बारामती, पुणे, मावळ, शिरूर, सांगली, सातारा आणि अहमदनर या जागांवर काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post