स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्त कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर -वारे वसाहत येथे गुरुवार दि.13/06/2024 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास भर दिवसा सुजल बाबासो कांबळे (वय 19.रा.टिंबर मार्केट) याचा आठ ते दहा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून करून पळुन गेले होते.याची फिर्याद त्याचा चुलता अजय कांबळे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली होती.
या भर दिवसा झालेल्या खून प्रकरणी शहरात खळबळ माजली होती.याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या .यांनी संयुक्त हल्लेखोरांचा शोध घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 12 तासात ओंकार राजेश पोवार (वय 19.रा.पंचगंगा तालीम),आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी (वय 21.रा.झुंझार क्लब शिवाजी पेठ),आशिष सुकेश भाटकर (वय 19.रा.पंचगंगा तालीम उत्तरेश्वर),तेजस उर्फ पार्थ कळके (वय 19.मस्कुती तलाव),श्रावण बाबासो नाईक ((वय 19.दत्त मंडळ सरनाईक कॉलनी ) यांच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.त्याच प्रमाणे जुना राजवाडा पोलिसांनी सादिक जॉन पीटर (वय 19.रा.राजाराम चौक ,टिंबर मार्केट) याच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.18/06/2024 प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके , स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे ,सहा.पो.नि.सागर वाघ ,पो.उ.नि.संदिप जाधव,समीर पडवळ,समीर कांबळे,वैभव पाटील,विनोद कांबळे आणि जुना राजवाडाच्या डी.बी.पथकाने कारवाई केली.