पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून डॉ योगेश साळे सर, यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस शंखनाद व प्रार्थना सौ.‌जयश्री घोलप, सौ योगीता भोसले, सौ.अर्चना लाड, सौ. हर्षदा कबाडे आणि मा. दत्ता पाटील.. (योगगुरू, सिध्दगीरी मठ कणेरी) यांनी घेतली.....

    या नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि  डॉ आरोग्य:धाम् येथील रुग्णांच्या हस्ते  कुंडातील वृक्षाला जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.....

   प्रास्ताविक भाषणात  "डॉ आरोग्यधाम् चे संस्थापक - डॉ श्रीकांत बामणीकर" यांनी उपस्थितातांचे  स्वागत केले, त्या नंतर हे पुस्तक का लिहावे असे वाटले ? याचा खुलासा देण्यात आला. आजच्या धकाधकीच्या  व धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ भेटत नाही. त्यामुळे व्याधी जडतात आणि आरोग्य बिघडते. "व्यक्ती तितक्या प्रकृती" एकच आजार अनेकांना होतं असला तरी उपचार वेगवेगळे असतात. आजार झाल्यानंतर आपण दवाखान्यात दाखल होतो. यांच्या उलट आजार होऊच नये म्हणून निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा) आहे. या उपचार पध्दतीत आजारांवर मात करता येते , शिवाय दुष्परिणाम विहीरीत असली ही उपचार पद्धती आहे. शरीर अंतर्गत होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष दिले तर शरीरच आपले आजार बरे करते, असे शरीरात दाब बिंदू आहेत . आपला हात जगन्नाथ या विषयावर मार्गदर्शन केले,  आणि हस्त मुद्रांचा उल्लेख केला. पुस्तकातील काही टाॅपीक वाचुन दाखवले. "प्रणव ध्यान  (ओंकार ध्यान) चिकित्सा" काय आहे ती कशा पद्धतीने करण्यात येते या बद्दल  अधीक माहिती पुस्तिका मधील वाचून दाखवली..

पुस्तक प्रकाशन नंतर डॉ योगेश साळे सर म्हणाले, या पुस्तकास माझी प्रस्तावना आहे.खुप सुंदर हे पुस्तक सरांनी लिहिले आहे. आरोग्य फक्त औषधनवर अवलंबून नसते तर प्राकृतिक चिकित्सा हेच आरोग्य आहे.  माहामारी रोग जंतू-संसर्ग वर औषध हा उपाय नाही. डांसा आपल्याला चावुन आपले आरोग्य बिघडवतात यावर खाञीशीर अॅलोपॅथीमध्ये इलाज नाही, पण प्राकृतिक चिकित्सा या मध्ये आहेत. योग्य आहार, रोज योग व प्राणायाम आणि व्यायाम, तसेच निसर्गिक जिवन प्रणाली साधले असता कोणताही व्हायरल आजार होणार नाही.... यांचीच आज गरज आहे 

  यानंतर डॉ दिलीप शहा यांनी हास्य योग या विषयावर मार्गदर्शन केले आणि पुढील भागात हास्य योग संदर्भात माहिती लिहावी त्याकरिता मी आपणास मदत करीन असे सांगितले. संत आमृतानंद महाराज यांनी प्राकृतिक जिवन जगण्याचा मुलमंञ  दिला. डॉ आरोग्य:धाम् द्वारा प्राकृती चिकित्सा सेवा डॉ श्रीकांत बामणीकर देतात त्यांनी आपले जीवन या कामी समर्पित केले आहे . त्यांच्या या कार्याला माझ्या कडून शुभेच्छा.....

    अध्यक्षीय भाषणात... डॉ कृष्णदेव गिरी यांनी सांगितले की तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्राकृतिक चिकित्सा हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. शंखनाद हे आपल्या जवळपासची निगेटिव्ह एनर्जी लेव्हल कमी करते. म्हणून ओंकार आणि शंखनाद जरुर घ्यावा...

    कार्यक्रम च्या शेवटी गौतम कर्णिक यांनी आभारप्रदर्शन केले आणि सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.स्वपणील पन्हाळकर यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post