प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कंळबे तर्फ कळे येथील अक्षय प्रकाश चौगुले (वय 29.रा कंळबे तर्फ कळे) याने मंगळवार दि.11/06/2024 रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आकाराम पाटील (कंळबे तर्फ कळे) यांच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला बेशुध्दावस्थेत उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत अक्षय हा उद्यमनगर येथे खाजगी नोकरी करत होता.त्याचे त्याच गावातील एका मुलीवर त्याचे प्रेम संबंध होते.ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजताच त्यानी या प्रेमाला विरोध करून त्या मुलीचा दुसरया ठिकाणी लग्न ठरवून तिचा साखरपुडा झाल्याची माहिती अक्षय मिळाल्याने त्याने या नैराशेतुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.