प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - इंचलकरंजीतील "एस.टी.सरकार "या टोळीवर कोल्हापूर जिल्ह्यातुन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.या मध्ये या टोळीचा मुख्य सुत्रधार संजय शंकरराव तेलनाडे (रा.गावभाग ,इंचलकरंजी ) , अरविंद सुकुमार मस्के (रा.अवधुत आखाडा ,इंचलकरंजी) ,राकेश सुरेश कुंभार (पाटील गल्ली ,इंचलकरंजी) , दिपक सतीश कोरे (रा.गावभाग राणाप्रताप चौक ,इंचलकरंजी ) , इम्रान दस्तगीर कलावंत आणि अरिफ दस्तगीर कलावंत (दोघे रा.ममता बेकरीच्या पाठीमागे),व अभिजीत सुभाष जामदार (रा.नदीवेश ,इंचलकरंजी) या सात जणांचा समावेश आहे.
या टोळीवर खून,दरोडा ,बलात्कार ,खूनाचा प्रयत्न,अवैद्य जुगार व्यवसाय ,फसवणूक आणि जबरी या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने इंचलकरंजी पोलिसांनी या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठविला होता.या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी हद्दपारीच्या आदेशाला मंजुरी दिली.त्या नुसार कोल्हापूर जिल्ह्यातुन एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.
कोल्हापूर शहरात आणि जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेंगारांच्या टोळीवर हद्दपार आणि स्थानबद्ध अशा कारवायांना सुरुवात केली आहे.इंचलकरंजी परिसरात या टोळीची वाढ़ती दहशत यामुळे ही कारवाई करण्यात आली.