सायबर चौकात भिषण अपघात ; माजी कुलगुरुच्या कारने पाच सहा जणांना उडविले.

 चार जण ठार तर तिघे जखमी.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - सायबर चौकात भरधाव वेगाने येणारयां कारने वाहनांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु वसंत मारुती चव्हाण (वय 74.रा शाहु टोल नाका) ,अनिकेत चौगुले (वय 22.रा पोर्ले तर्फ ठाणे ),हर्षद सचिन पाटील (वय 16.)आणि प्रथमेश सचिन पाटील (  वय 19.दोघे रा .दौलतनगर ,राजारामपुरी कोल्हापूर ) ह्या दोघा सख्या भावासह चौघे मयत झाले असून तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की,यातील मयत माजी कुलगुरू हे स्वतः कार चालवित भरधाव वेगाने कार चालवित येत असताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांचा पाय ब्रेकवर पडण्या एऐवजी एक्सीलेटरवर पाय पडल्याने त्यांनी चार पाच वाहनांना उडविल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.हर्षद आणि प्रथमेश हे दोघे सख्खे भाऊ दुपारच्या सुमारास राजाराम तलाव येथे पोहण्यास गेले असताना ही दुर्घटना घडली असून यां दोघांना  त्याची आई जेऊन बाहेर जावा असे म्हणत असल्याचे त्यांच्या नातेवाईका कडुन माहिती मिळाली.अनिकेत चौगुले हा एका ल्यब मध्ये नोकरी करत असल्याचे समजले.तो एकुलता एक मुलगा होता.माजी कुलगुरू वसंत मारुती चव्हाण हे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून त्यांना पत्नी ,दोन विवाहित मुली आणि एक मुलगा कॉलेज मध्ये शिकत आहे.हर्षद सचिन पाटील याच्या झालेल्या अपघातात मयत झाल्याची माहिती सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post