जोतिबा डोंगर येथे एस .टी . वर्धापन दिन साजरा करण्यात आला


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर :  जोतिबा डोंगर येथे एस .टी . वर्धापन दिन साजरा करण्यात आला . श्री . जोतिबा डोंगर बस स्थानकावर ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गाडी क्र. ०५ ११ चे पुजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्हाळा तालुका सदस्य श्री.दत्तात्रय मिटके यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रवाशांना साखर वाटप करून एसटी प्रवाशांचे महत्त्व सांगण्यात आले .या वेळी  कार्यक्रमास प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालक-एम.के.धनगर व वाहक-निवास माळी, पेपर विक्रेते मुरली कांबळे , प्रवासी-राधाबाई, सुनीता, मंगल, रुक्मिणी चौगुले, लक्ष्मण सुतार व वाहतूक नियंत्रक श्री.सुधाकर सनगर, उपस्थित होते. फोटो कॅप्सन : एस.टी चा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त एसटीचे पुजन करताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पहाळा तालुका सदस्य दत्तात्रय मिटके सोबत  वहातुक नियंत्रक सुधाकर सनगर , पत्रकार मुरलीधर कांबळे  एस .टी .चे चालक वाहक व प्रवाशी वर्ग

Post a Comment

Previous Post Next Post