प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील चुये येथे रहात असलेले मारुती आनंदा कांबळे (वय 51.रा चुये ) यांचा रविवार दि.30/06/2024 रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास थळाचा माळ येथे असलेल्या पाण्याच्या नाल्यात पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत असलेल्या मारुती कांबळे यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचार चालू असताना त्यांचा पावणे अकराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
मयत हे शेती करीत असून त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुली आहेत.
----------------------------------------
ब्रम्हपुरी येथे झालेल्या अपघातात तरुण जखमी.
कोल्हापूर - शनिवार पेठ येथील रहात असलेले प्रथमेश अशोक जिनराळे (वय 29) याचा रविवार दि.30/06/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास ब्रम्हपुरी येथे झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
https://youtu.be/aQw08lK8UHw?feature=shared